पनवेल दि.९: पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक १३ एप्रिल २०२५, रविवार रोजी दी.बा.पाटील विद्यालय, आगरी समाज हॉल समोर पनवेल येथे महापालिकेच्यावतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा महापालिका हद्दीतील तरूण तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ५ वी पास ते पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, एमबीए, बीई, फायनान्स इत्यादी सर्व क्षेत्रातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे वय १८ ते २८ दरम्यान असावे. मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. उमेदवारांनी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती (५ प्रतींमध्ये) घेऊन उपस्थित राहावे. महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या या भव्य रोजगार मेळाव्यासाठी निष्केन फाऊंडेशनची नेमणूक करण्यत आली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक किंवा QR कोड वापरावा: https://forms.gle/KRRBZnGVUDCFVMj77
वेळ: सकाळी ९ ते संध्या ५ पर्यंत
संपर्क: ७३९१९ ६६२९५ / ९५११९ १०३५०

🛑”स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५”; सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायतीला १ लाख रुपये बक्षीस

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!