पनवेल दि.६: वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे. पनवेलमधील पत्रकारांनी पत्रकारितेचा वसा घेतला आहे.पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत. त्यांची भूमिका योग्य असल्याने महानगरपालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले. पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील सरस्वती विद्यामंदिर येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी परेश ठाकूर बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक मोतीलाल जैन, संजय जैन, मुख्याध्यापक व्ही. एन. राठोड, पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश कोळी, सल्लागार रमेश भोळे, पत्रकार कुणाल लोंढे, राजेश डांगळे, वैभव गायकर, सुमंत नलावडे, लक्ष्मण ठाकूर, अनिल कुरघोडे, दीपक घरत,अविनाश जगधने, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गातारे, बाबा आडवलकर उपस्थित होते. परेश ठाकूर पुढे म्हणाले, वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे. या माध्यमातून सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,क्रीडा,आर्थिक,आरोग्य तसेच करमणुकीच्या बातम्या समजतात.त्यामुळे वाचकाला वृत्तपत्र हे आपला मित्र वाटते.ज्ञानात भर घातली जाते. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी, पनवेल मीडिया प्रेस क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करताना सामाजिक कार्यात आपण पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. पनवेलमधील पत्रकारांनी आजवर चांगली पत्रकारीता केली आहे.भविष्यात ही परंपरा जोपासली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. मोतीलाल जैन व संजय जैन यांनी या उपक्रमास सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कोळी यांनी केले.सूत्रसंचालन ज्ञानेश आलदर यांनी केले. रमेश भोळे यांनी आभार व्यक्त केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!