अलिबाग‍ दि.6, भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01/01/2020 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. पुर्व-पुनरिक्षण उपक्रम-मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) हा मोहिम रुपाने SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण सारख्या इतर पूर्व-पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे करणे. कालावधी-दि.11 नोव्हेंबर 2019 (सोमवार) ते दि.13 फेब्रुवारी 2020 (गुरुवार).
पुनरिक्षण कार्यक्रम – एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे कालावधी 28 फेब्रुवारी 2020 (शुक्रवार).
दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी- 28 फेब्रुवारी, 2020 (शुक्रवार) ते 27 मार्च, 2020 (शुक्रवार).
विशेष मोहिमांच कालावधी- 7 मार्च, 2020 (शनिवार) आणि 8 मार्च 2020 (रविवार) व 14 मार्च, 2020 (शनिवार) आणि 15 मार्च, 2020 (रविवार).
दावे हरकती निकालात काढणे- 15 एप्रिल 2020 (बुधवार) पूर्वी.
प्रारुप मतदार यादीच्या मापदंडांची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करीता आयोगाची परवानगी घेणे- 24 एप्रिल 2020 (शुक्रवार) पूर्वी.
डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई इत्यादी- 30 एप्रिल, 2020 (गुरुवार) पूर्वी
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- 5 मे, 2020 (मंगळवार).

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!