पर्यावरण संवर्धनाच्या निमित्ताने काढलेल्या फेरीला उदंड प्रतिसाद
पनवेल दि.६: ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्र सेवा दल तर्फे पनवेल मधील एतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली.
वडाळे तलाव,बल्लालेश्वर मंदिर, राईस मिल, कापड बाजार,मिरची गली. इस्रायल तलाव अशा विविध एतिहासिक ठिकाणांना भेट देण्यातआली.
यावेळी महान शहर मावळता वारसा या पुस्तकाच्या लेखिका प्रा. स्मिता दळवी यांनी उपस्थितना एतिहासिक ठिकाणांना बद्दल माहिती दिली.
पनवेल हे जसे तलावांचे शहर आहे तसेच मंदिरांचे आणि दर्गा मशिदीचेही शहर आहे. पनवेलमध्ये सहा तलाव आहेत. सर्वात मोठा असलेल्या वडाळे तलावाच्या काठी बल्लाळेश्वर आणि रामेश्वर मंदिर आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या कृष्णाळे तलावाकाठी कृष्णेश्वराचं मंदिर आहे. देवाळे तलावासमोर करमअली शाह दर्गा आहे. लेंडाळे तलावाला लागून जुम्मा मशीद आहे. विश्राळे तलावाला स्थानिक लोक जवळच्या बेने इस्रायली समाजाच्या कब्रस्तानामुळे आणि प्रार्थना स्थळामुळे इसराइल तलाव असे म्हणतात. प्रत्येक तलावाचा इतिहास भूगोल वेगवेगळा आहे. १७३९ मध्ये वसईच्या यशस्वी लढाईनंतर परतताना चिमाजी आप्पांच्या मराठा सैन्याकडून बापटांनी वडाळे तलाव खोदून घेतला अशी माहिती मिळते. या वडाळे तलावाचे पनवेल महानगरपालिकेने चांगले सुशोभीकरण केले आहे. इतरही तलावांचे जाणीवपूर्वक जतन केले तर शहराची ही फुफूसं पनवेलचे पर्यावरणीय आरोग्य अबाधित राखतील.
हिंदू मुस्लिम ऐक्याची इथली गंगा जमनी तहजीबची एक कथा सांगितली जाते. देवाळे तलावाच्या काठी असणाऱ्या सुफी संत ख्वाजा करमअली शाह यांच्या दर्ग्यावर वार्षिक उरुसाच्या प्रसंगी पहिली चादर चढवण्याचा मान परंपरेनुसार पेशव्यांचे सरदार बाळाजीपंत बापट यांच्या कुटुंबासाठी राखून ठेवला जातो.. मनातलं मळभ दूर करणारा आजच्या भटकंतीतला हा क्षण आहे. जगद्गुरु संत तुकाराम देहूहून पनवेल येथील बाजारात मिरच्या विकण्यासाठी आले होते. कृष्णाळे तलावाकाठी त्यांचे सुंदर मंदिर पहावयास मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे जवळपास ३० राईस मिल होत्या. युसुफ मिया मिल यांची चालू अवस्थेतील राईस मिल पाहिली. त्यांच्या वंशज्यांशी बोलणं झाले. १८७२ साली पुराणिक बंधूंनी धूतपापेश्वर कारखाना स्थापन केला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस अशा महान विभूतींनी या ठिकाणी आयुर्वेदिक औषधोपचार घेतलेले आहेत.. बंदर ते विमानतळ असा पनवेलचा विस्मयकारी प्रवास चालू आहे. आता बंदर अस्तित्वात नाही. कोळीवाड्यात त्या बाजूला गेलो असता काही मुलनिवासी कोळी बांधव भेट झाली. २६ जुलै २००५ च्या पुरात स्वतःला झोकून देऊन जीवाची बाजी लावून कमळाकर पांडुरंग कोळी या बांधवाने तब्बल ३८ जणांचे प्राण वाचवले होते. भारतमातेच्या या शूर वीराला मनोमन सलाम केला.. राष्ट्र सेवा दल, मिशन माणुसकी, संविधान प्रचारक, योग ग्रुप असे अनेक मान्यवर पनवेलकर या आजच्या पर्यावरण संवर्धनाच्या निमित्ताने काढलेल्या फेरीला आवर्जून उपस्थित होते.
पनवेल मधील तलावाच्या जवळ असलेल्या मशिदी आणि मंदिर म्हणजे गंगा जमुना तहजीब चे दर्शन होते. हिंदू आणि मुस्लिम घटकांच्या मिश्रणाने वैशिष्ट्यीकृत संस्कृतीचा संदर्भ पनवेल मधल्या एतिहासिक ठिकाणात दिसून येते. पनवेल मध्ये झपाट्याने होणाऱ्या विकास कामामुळे पर्यावरण आणि एतिहासिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे दिसून येते. राष्ट्र सेवा दलाच्या ग्रीन नेटवर्क, नवी मुंबई विभागाच्या वतीने Panvel Heritage Walk आयोजन करण्यात आले होते.
यापुढे ही राष्ट्र सेवा दलच्यावतीने पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जातील अशी माहती प्रवीण जठार यांनी दिली. विनीत बालकुंद्री, मारुती शेरकर, चित्रकार उत्तम घोष, संविधान प्रसारक धनश्री आणि प्रवीण जठार यांनी या कार्यकमच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली

🛑रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!