पनवेल दि 25: पनवेलमधील महावितरणच्या भिंगारी विभागातील दोन अभियंत्यांना 1 लाख 84 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाने रंगेहात अटक केली.
याप्रकरणी अटक करण्यात आलेले उप कार्यकारी अभियंता संदीप आण्णासाहेब डावरे (वर्ग 2) आणि कनिष्ठ अभियंता प्रथमेश नवचंद्र चोगुले (वर्ग 3) हे दोघेही पनवेलच्या भिंगारी विभागात कार्यरत होते. महावितरण कंपनीच्या वतीने सदर तक्रारदार फर्मला दोन सिव्हिल वर्कची कामे देण्यात आली होती. त्यानुसार मार्च अखेरीस एका सिव्हिल वर्कच्या कामाचे बिल मंजूर होऊन कंपनीच्या खात्यावर बिल जमा झाले होते. परंतु दुसर्‍या कामाच्या बिलासंदर्भात साइट व्हिजिट व बिल मंजुरीसाठी डावरे व चौगुले या दोघांनी प्रत्येकी 92,000 रुपये अशी एकूण 1.84 लाख रुपयांची लाच मागितली होती. या बाबतची तक्रार 24 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार स्वरूपात नोंदवण्यात आली. त्यानंतर पडताळणी करण्यात आली आणि लाच मागणी खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे दोन्ही अभियंत्यांना प्रत्येकी 92 हजार रुपये दिले आणि त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाच्या अधिकार्‍यांनी साक्षीदारांच्या समोर रंगेहात अटक केली. लाच स्वीकारण्याची ही कारवाई थेट महावितरण विभाग भिंगारी विभागाच्या कार्यालयात पार पडली. या संपूर्ण सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाने यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलिस. उपनिरीक्षक. नि. जाधव, पोलिस नाईक विशाल अहिरे, पोलिस शिपाई. यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.

♦️दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी तर्फे विनामुल्य प्रशिक्षण !
♦️”स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५”

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!