पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी वारीची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद होणार असून. यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेतला आहे. तसा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला जाणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्यावतीने ही माहिती दिली आहे.
वारीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांनी एका खासगी प्रसारमाध्यमाला सांगितले की, वारीशी संबंधित सर्व साहित्यही संकलित करण्यात येत असून येत्या दोन-तीन महिन्यांत पंढरपूर वारीला जागतिक वारसा दर्जा मिळवा यासाठी युनेस्कोकडे पाठवला जाईल.
