अलिबाग दि.०१: भारतीय संस्कृतीतील ‘गुरु-शिष्य परंपरा’ही मानवजातीला हिंदु धर्माने दिलेली अद्वितीय देणगी होय ! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या थोर गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेला 1 हजार पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ सर्वांना व्हावा, तसेच गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. या वर्षी 3 जुलै 2023 या दिवशी गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सनातन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल, कामोठे, रसायनी, अलिबाग, उरण आणि कर्जत येथे गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले आहे.
हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. त्या त्या काळी अधर्म माजला असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केले. आजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे, यावर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे हा होय. यासाठी या महोत्सवांत ‘संविधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर अनमोल मार्गदर्शन होणार आहे. सनातन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यात पुढील ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले आहे.
सोमवार, 3 जुलै 2023, सायं. 5.30 वा.
- कराडी समाज हॉल,सेक्टर 14, कामोठे ,नवी मुंबई
- श्री बँक्वेटस,सेक्टर 1/S,प्लॉट नंबर 113 आणि 114, शबरी हॉटेल जवळ, नवीन पनवेल
- श्री साई सभागृह,साई मंदिर,एच.ओ. सी.कॉलनी, मोहोपाडा, रसायनी
- भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, निलिमा हॉटेलच्या मागे, अलिबाग
- रायगड जिल्हा परिषद,केंद्र शाळा,कोप्रोली, उरण
- रॉयल गार्डन मंगल कार्यालय,चौक-कर्जत-मुरबाड हायवे मुद्रे(बु.),कर्जत
या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); साधनेविषयी लघुपट, समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. तसेच धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
आपली नम्र,
सौ. नयना भगत
प्रवक्ता, सनातन संस्था
(संपर्क क्र. : 9920015949)