पनवेल दि.४ (हरेश साठे) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर नाव घेतले कि डोळ्यासमोर येते विकासमूर्ती. विकासकामांचा डोंगर, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, अशा क्षेत्रातील समाजप्रिय डॅशिंग नेतृत्व म्हणजेच आमदार प्रशांत ठाकूर. पक्ष संघटनेची बांधणी हा त्यांचा हातखंडा युवा पिढीला कायम आदर्श देणारा आहे. लहानग्यांपासून वृद्धांर्यंत आणि युवकांमध्ये त्यांच्या प्रती असलेला आदर कायम पहायला मिळतो. अफाट लोकप्रियता त्यांनी आपल्या विधायक कार्यातून प्राप्त केली आहे, सलग चारवेळा आमदार होऊनसुद्धा त्यांच्या वर्तनात कधीही बडेजाव दिसत नाही. आणि हीच त्यांची खासियत सर्व समाजात आदर्श देणारी ठरली आहे. त्यामुळे संघटन कौशल्य… आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर हे होय.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वसा समर्थपणे चालवित समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार, सिडको अध्यक्ष यासह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदे त्यांनी भूषविली असले तरी ‘कितीही मोठा झालो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे’ हीच समाजहिताची भूमिका त्यांनी जोपासली त्यामुळे खऱ्या अर्थाने कर्तृत्वाने ते मोठे झाले. त्यामुळे ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशी टॅगलाईन त्यांच्या नावाला लागली आहे.
अवघ्या कोकणचे समर्थ नेतृत्व असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलला विकासाचे मॉडेल बनविण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. राजकीय कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी हवी आणि असेच अपेक्षित असते. याचे मूर्तिमंत उदाहरण आमदार प्रशांत ठाकूर हे आहेत. त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. सत्तेत असो व नसो जनतेसाठी सतत काम करायचेच आणि हाच त्यांचा पिंड त्यांना विधायक कार्य करण्याची ऊर्जा देतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, युवकांच्या हातात देश द्यायचा आहे. त्यासाठी सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आहेत. लोकांच्या सुख दुःखात धावून जात त्यांना आधार देण्याचे काम ते सातत्याने करीत असतात. त्यांच्या जवळ असलेला लोकसंग्रह खूप मोठा आहे. पक्षभेद न मानता कुठलाही व्यक्ती येवो त्याचे काम करणे हा त्यांचा कायम ध्येय राहिला आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता ते नगराध्यक्ष पुढे सलग चारवेळा आमदार असा प्रवास करणारे कोकणातील युवकांचे आदर्श म्हणून त्यांची ख्याती झाली. अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि शिकवण लाभल्यामुळे ते नेहमी जोशामध्ये घाईघाईने कोणताही निर्णय न घेता जे काम करायचे ते उत्कृष्ट करायचे असा त्यांचा ध्यास सदैव दिसतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत राबविले जाणारे अनेक उपक्रम आणि त्यांचे नियोजन पाहिले असता, त्या उपक्रमामागील असणारी त्यांची तळमळ दिसून येते. सकाळी लवकर त्यांचा दिनक्रम सुरु होतो. आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढणे त्यानंतर दिवसभर पायाला भिंगरी लावून सतत वेगवेगळे विषय हाताळणे हे त्यांच्या अंगवळणीच पडले आहे, असे म्हणावे लागेल. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, राजकीय, अशा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. आज पर्यंत त्यांनी केलेली कार्य समाजात आदर्श निर्माण करणारी आहेत. लोकांना सदृढतेचा मार्ग दाखवण्यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात, त्यामुळे या तरुण नेतृत्वाकडून अभ्यासू असण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. या अपेक्षेला आमदार प्रशांत ठाकूर पुरून उरतात. त्यांच्या सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील भाषणांतून याची प्रचिती येते. विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची वृत्ती सर्वांना मोहात टाकणारी ठरते. पायाभूत सुविधा, देण्याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक सेवा करण्याचे अबाधित काम त्यांच्याकडून होत आहे. राजकीय नेते शक्यतो कला, साहित्य, क्रीडा या प्रांतापासून चार हात लांब असतात, मात्र आमदार प्रशांत ठाकूर याला अपवाद आहेत. राजकीय स्वार्थासाठी विविध स्पर्धा न भरवता प्रत्यक्ष बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालून उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करीत ते पनवेल आणि रायगडमधील कलावंत आणि खेळाडू, तसेच साहित्यिकांना प्रोत्साहन देत असतात. स्वतः नवनवीन पुस्तकांचे वाचन करताना ते नेहमी आढळतात. कलेला राजाश्रय मिळाल्यामुळेच रायगड मधील कलावंत उच्च यश संपादन करताना दिसत आहेत. आपल्या धावपळीच्या जीवनात असे कार्यक्रम त्यांना आत्मिक आनंद देत असल्याची कबुली ते नेहमीच देतात. पनवेलला विकासात बदलण्याचे आणि वेळोवेळी संकटकालीन परिस्थितीत लोकांना मदतीचा हात देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.
पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे, हि त्यांच्या संघटन कौशल्यातून नेहमीच अधोरेखित झाली आहे. जिल्हा किंवा जिल्ह्याबाहेर आलेल्या नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी सढळ हस्ते मदत आणि धीर देण्याचे काम केले असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. मात्र हे कार्य त्यांनी कधीही सवंग लोकप्रियता किंवा प्रसिद्धीसाठी केले नाही. माणूस आणि माणुसकी म्हणूनच त्यांच्याकडून विधायक कार्य घडत आहे. सर्व क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांचे भरीव योगदान आहे. अर्थात यामागे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा भक्कम पाठिंबा आहे हे सर्वश्रृत आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा वसाच त्यांनी घालून दिलेला आहे.त्याच मार्गावरुन आमदार प्रशांत ठाकूर वाटचाल करीत आहेत. सतत सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन समाजाला कोणती गरज आहे हे लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर ऊन पावसाची तमा न बाळगता दिवसातून १८- १८ तास काम करीत, जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ते कार्यातून अधिक दृढ करताना दिसतात. डोंगरासारखे त्यांचे कार्य संपूर्ण राज्याने पाहिले आहे, त्यांचे कार्य नेहमीच ऊर्जा देणारे आहे, असे कार्यसम्राट, लोकप्रिय, आणि लोकसेवेचा अखंड वसा घेतलेले आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

🛑Silver Jubilee World Tour:🔹आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!