पनवेल दि.६: विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ आणि जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई, संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गोवेली जि. ठाणे आयोजित ठाणे पालघर ग्रामीण झोन क्र. 6, मधील 58 वा युवक महोत्सव मोठ्या उत्सहात साजरा झाला. यामध्ये एकूण 15 महाविद्यालयाने सहभाग नोंदवाला होता. त्यापैकी रयत शिक्षण संस्थेचे, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान महाविद्यालय मोखाडा येथील एकूण 15 स्पर्धामध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून तारपा, क्ले मॉडेलिंग आणि पोस्टर मेकिंग या स्पर्धेत यश संपादान करून पहिला क्रमांक प्राप्त केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विशेष अनुदान महाविद्यालयात दिले होते. त्यांच्यामुळेच महाविद्यालयाला यश प्राप्त करता आले. ग्रामीण भाग त्यातही आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विकास आणि सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा हा त्या पाठीमागे मोठा उद्देश होता. आपल्या भागातील मुलं इतरांपेक्षा कमी नाही, मुलांच्या कलागुणांना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महत्त्व आहे हे महत्व आपल्याला संस्कृती टिकवण्यासाठी त्या आवश्यक आहे. त्यामुळे नियोजनबद्ध आणि क्रियाशील उपक्रम राबवा आणि महाविद्यालयाची प्रगती साधा या मंत्रामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. बद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अँड. भगीरथ शिंदे व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भरभरून कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. चांदोरे व प्राचार्य डॉ. एस. जी. मेंगाळ यांनी देखील यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
सदर स्पर्धांसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.व्ही. एम. मोरे, प्रा. आर. डी. घाटाळ, प्रा. डी. आर. भोये, प्रा. बी. पी. कनोजा व सांस्कृतिक विभागतील सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली. त्याच बरोबर तारपा नृत्यासाठी मार्गदर्शक रघुनाथ भोये, तारपा वादक भिवा सुनाड यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

🛑Silver Jubilee World Tour:🔹आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!