पनवेल दि.७: गणपतीबाप्पा हे अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर सार्‍या देशाचे दैवत आणि श्रद्धास्थान. या गणरायाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागलेले असताना हा गणपतीबाप्पा आपल्यालाही आपल्या हाताने घडविता यावा असे बाळगोपाळांना न वाटते तरच नवल ! नेमकी हीच भावना लक्षात घेऊन पनवेल कल्चरल सेंटरने पनवेल परिसरातील केवळ बाळगोपाळांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही शाडू मातीच्या गणपती कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्या सभागृहात केले होते. संस्थेचे कला विभाग प्रमुख मिलिंद देशमुख यांंच्या कल्पनेतून साकार झालेल्या या कार्यशाळेत तब्बल 29 लहान-मोठ्यांनी सहभाग घेतला होता. नागपूर विद्यापीठाचे फाईन आर्टस्चे मास्टर्स असलेल्या प्रवीण पडवळ यांनी या कार्यशाळेत शिबिरार्थींना मार्गदर्शन केले आणि प्रत्येकाकडून गणपतीची एकेक सुंदर मूर्तीही घडवून घेतली. प्रवीण पडवळ यांनी शिल्पकलेचे शिक्षण जे.जे.स्कूल ऑफ आर्ट, मुंबईत घेतले असून ते गेली 18 वर्षे या कला क्षेत्रात कार्यरत आहेत.
प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार कर्वे यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यशाळेविषयी माहिती दिली. प्रवीण पडवळ यांनी केलेल्या छोट्या गणेशमूर्तीला गुलाबपुष्प अर्पण करून आणि सर्वांकडून ‘वक्रतुंड महाकाय.. हा श्लोक म्हणवूून प्रत्यक्ष कार्यशाळेला सुरुवात झाली. सलग चार तास चाललेल्या या कार्यशाळेनंतर सर्व सहभागी शिबिरार्थींना संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

🛑Silver Jubilee World Tour:🔹आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!