Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

पनवेल दि. १२: प्रेम या विषयावर चर्चा मांडणी करण्यासाठी मनात एक अडी असते प्रत्येकाच्या….मित्रमैत्रिणी सोडले तर मोकळेपणाने यावर बोलण्यासाठी असे मंच अथवा स्त्रोत नसल्याने फार बंदिस्त आहे ही संकल्पना आणि त्यामुळे येणारा अवघडलेपण. त्याला एक चौकट घालून दिली आहे व्यक्त होण्यासाठी… ती म्हणजे “लग्न” त्यापलीकडे त्यावर बोलणं कठीण असतं त्यामुळे तरुणांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नेहमीच भेटत असणाऱ्या विवेक वहिनीने यावेळी एक नवा प्रयोग मांडला तरुणाईच्या भाषेत ‘ओपन माईक’. प्रेम या विषयावर मांडणी करण्याची संधी उपलब्ध करण्यासाठी वेलेंटाइन वीकच्या निमित्ताने प्रेमाच्या संकल्पना व त्यावर व्यक्त होण्यासाठी ओपन माईक हा उपक्रम हाती घेतला. रविवार 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सेक्टर 11 येथील सिडको उद्यानातील अँम्पी थिएटर मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये प्रेम या संकल्पनेवर गाणी, कविता, गोष्टी, नजम, शायरी, जुमला, एखादा उतारा याचे सादरीकरण झाले. विवेक वाहिनी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल यांच्या सहकार्याने हा नवीन प्रयोग सादर केला गेला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!