पनवेल दि: ८: खारघरमध्ये आज आणखी एक कोरोनाचा रूग्ण आढळला असून पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. खारघरमधील एकाला कोरोनाची लागण झाली असून वाशी येथील महापालिकेच्या रूग्णालयात संबंधित रूग्ण उपचार घेत आहे. अशाप्रकारे खारघरमधील कोरोनाबाधितांची संख्या ४ वर पोहोचली असून महापालिका हद्दीत एकूण १७ तर उलवे नोडमध्ये ४ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.