पनवेल दि.१८ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी सोनवणे यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी दैनिक वादळवारा संपादक विजय कडू, दैनिक सामनाचे पत्रकार संजय कदम, केवल महाडिक, नितीन जोशी, राज भंडारी, अनिल राय, लालचंद यादव, अण्णा आहेर, शंकर वायदंडे, रवी पाटील, तुलसीराम बोरिले, रवींद्र गायकवाड पत्रकार उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार व पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवडी करण्यात आली आहे. निलेश सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून पनवेल युवा या वृत्तपत्राचे संपादक आहेत. पत्रकारिता करीत असताना आता सोनवणे यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करीत थेट सोनवणे यांचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव पाहता त्यांना पनवेल शहरांची जबाबदारी देण्यात आली असून. या निवडीबद्दल पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी पनवेल शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी सोनावणे यांचा सत्कार करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांनी मनोगत व्यक्त करीत सोनवणे यांना पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

दिबांच्या नावासाठी पत्रकारांची मागणी
प्रकल्पग्रसतांचे नेते लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला दयावे यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त, राजकीय क्षेत्रातून पाठपुरावा सुरु असतानाच दिबांच्या नावासाठी पत्रकारांनी एक पाऊल पुढे टाकले असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उड्डाणंमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती निलेश सोनवणे यांनी दिली.

🛑माझी कैलास मानसरोवर यात्रा ०.२ – महेंद्र घरत🔹’कैलास मानसरोवर यात्रा’ प्रवासातील स्मरणीय अनुभव कथन

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!