मुंबई दि.२९: यावर्षी बुधवार, दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्री गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५५ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. जर यावेळेस  गणेशपूजन करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण दिवसभर कधीही गणेश पूजन केले तरी चालेल असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ज्येष्ठा गौरी शनिवार ३ सप्टेंबर रोजी रात्री १०-५६ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवार ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने  सोमवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ८-०५ पर्यंत करावे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या वेळा सकाळी ११-१६ आणि रात्री ११-२७ अशा असून ओहोटीच्या वेळा पहाटे ४-३६ आणि सायं. ५-२२ अशा आहेत.
      पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशीरा मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!