पनवेल दि.२९: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री स्पर्धेत ख़ुशी चौधरी, तृषान्तु बोबडे तर द्विपात्री राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेत उमेश वाळके व प्रतिकेश मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात एकपात्री व द्विपात्री अभिनय राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, तर सन्माननीय अतिथी म्हणून अभिनेते पृथ्वीक प्रताप, भरत साळवे यांची उपस्थिती लाभली.
या स्पर्धेतील १२ ते १८ वर्षे एकपात्री अभिनय गटात ख़ुशी चौधरी प्रथम, युवराज राळे द्वितीय, अनुश्री जोशी तृतीय तर स्मर्निका घाग व क्रांतिसिंह पाटोळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. १९ वर्षांपुढील एकपात्री अभिनय गटात प्रथम क्रमांक तृषान्तु बोबडे, द्वितीय क्रमांक मानसी पवार, आकांक्षा पवार तृतीय तर सायली गावंड व सेजल जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय गटात उमेश वाळके व प्रतिकेश मोरे यांनी प्रथम क्रमांक, श्रद्धा सावंत व स्वरा यांनी द्वितीय, तृतीय क्रमांक सिद्धेश शिंदे व स्वप्निल बंडारकर यांनी पटकाविले. तसेच उत्तेजनार्थ मानसी जाधव व सायली इंदुलकर, अक्षता साळवी व रसिका पवार यांनी प्राप्त केले.
आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांचे आयोजन केले जाते. ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ असे ब्रीद घेत अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि कलाकारांच्या अविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या नाट्य संस्था यात सहभागी होतात. त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेत मुंबई, पुणे, रत्नागिरी, अंधेरी, विरार, ठाणे, रायगड, व राज्यातील इतर भागातील स्पर्धकांनी सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अमोल खेर, संजीव कुलकर्णी, गणेश जगताप, चिन्मय समेळ यांनी विशेष मेहनत घेतली.

अशी होती पारितोषिके –

राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धा
प्रथम क्रमांक – १० हजार रुपये व चषक,
व्दितीय क्रमांक ०९ हजार रुपये व चषक,
तृतीय क्रमांक – ०७ हजार रुपये व चषक
उत्तेजनार्थ पारितोषिक ०५ हजार रुपये (एकूण दोन पारितोषिके )

एकपात्री अभिनय स्पर्धा
प्रथम क्रमांक – ०५ हजार रुपये व चषक,
व्दितीय क्रमांक ०३ हजार रुपये व चषक,
तृतीय क्रमांक – ०२ हजार रुपये व चषक
उत्तेजनार्थ पारितोषिक ०१ हजार रुपये (एकूण दोन पारितोषिके )

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!