पनवेल दि.१७: आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील NMGKS संघटने कडे कामगारांचा कल वाढताना दिसत आहे. नुकतेच स्पीडीमल्टीमोड JNPA मधील 450 कामगारांनी व JNPA मधील 400 सफाई कामगारांनी महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.
मे . ब्रॉड मार्केटिंग ॲन्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेटवर्क प्रा. ली (बाबाजी शिवराम, धुतूम) या गोडाऊन मधील कामगारांच्या पगारवाढीच्या करार 16 डिसेंबर रोजी सुखकर्ता -शेलघर येथे संपन्न झाला. या करारनाम्यानुसार कामगारांना 5000 रुपयाची पगारवाढ, एक ग्रॉस सॅलरी बोनस तसेच कामगार व त्यांच्या परिवारासाठी मेडिक्लेम सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. एक वर्षाचा पगार वाढीचा फरक जानेवारी महिन्याच्या वाढीव पगारासोबत कामगारांना मिळणार आहे त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या करारनाम्याप्रसंगी प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पि. के रामण,सरचिटणीस वैभव पाटील, मुरलीधर ठाकूर, अंगत ठाकूर, विवेक म्हात्रे, मार्गदर्शक राजेंद्र गिरी तर व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर रेखा देशपांडे, मॅनेजर गणेश म्हस्कर व कामगार प्रतिनिधी गणेश म्हात्रे, समाधान ठाकूर, शंकर म्हात्रे, ईशान ठाकूर, निलेश ठाकूर, विकास ठाकूर, जोमा पाटील आदी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!