पनवेल दि. १८: साहस फौंडेशन ह्या संस्थेने एसएस सिनेव्हिजन आणि श्री प्रह्लाद राय झुलेलाल ट्रस्ट पनवेल च्या साहाय्याने ब्युटी पेजंट- महाराष्ट्र ची सौंदर्यवती 2025, पनवेल येथील सिंधी पंचायत हॉल मध्ये उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन साहस फौंडेशन चे अध्यक्षा रेश्मा कुरूप, झुलेलाल ट्रस्ट चे ऍडव्होकेट मनोहर सचदेव, एक्टरेस सिद्धी कामत, रेश्मा भोईर व इतर मान्यवर ह्यांनी द्वीप प्रज्वल करून केले. ह्या ब्युटी पेजन्ट चे वैशिष्ट्य म्हणजे हे ब्युटी पेजन्ट लहान मुलं मुली, मिसेस व मिस बरोबर स्पेशली एबल्ड चाईल्ड ह्यांना सुद्धा समाविष्ट करण्यात आला होता. अध्यक्ष रेश्मा कुरूप ह्यांनी माहिती दिली कि सौंदर्य स्पर्धांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आम्ही एक संस्था म्हणून ह्या मुलांना सुद्धा सामान्य मुलं बरोबर व्यासपीठ देऊन त्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केले आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांना स्पर्धा करण्याची आणि त्यांची प्रतिभा आणि टॅलेंट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.
ह्या स्पर्धा मध्ये एकूण 65 स्पर्धक भाग घेतले होते. महाराष्ट्र ची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद मानसी सुर्वे (50+ वयोगट ), महाराष्ट्र ची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद हर्षला कारंडे, महाराष्ट्र ची सौंदर्यवती मिसचे विजेतेपद पूजा भांडारकर व इतर स्पर्धकांना फॅशन आयकॉन, फोटोजेनिक फेस अशा वेग वेगळे टायटल्स देऊन स्पर्धकांना क्राऊन आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला. तसेच विजेत्या स्पर्धकांना मालाबार ज्वेलर्स कडून चांदीचे कॉइन व व्हीएलसीसी कडून गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सिनेस्टार संजय खापरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, निलेश सोनावणे, केवल महाडिक, सुमंत नलावडे, संतोष आमले, मेघना कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे कोमल व कोरिओग्राफी एक्टरेस स्वप्नाली केलजी व ऍक्टर देवदत्त घरत ह्यांनी केले तर विजेत्यांची निवड कामोठे येथील आदी मॅटर्निटी हॉस्पिटल व स्किन क्लिनिक चे डायरेक्टर डॉ. शीतल गोसावी, एक्टरेस अर्चना पवार व स्वाती सोनावणे ह्यांनी केले. त्याच बरोबर ह्या कार्यक्रमात माननीय मोहिनी विक्रांत पाटील, भूषण पोवळे, महादेव घरात, उद्योजिका रेश्मा भोईर, उद्योजिका माधवी भोईर व मान्यवर उपस्थित होते व प्रीतम म्हात्रे ह्यांचा विशेष सहकार्य होत तसेच साहस फौंडेशनच्या मेंबर अनघा गोळे, शीतल आंबेरकर, अनविका, अजिंक्य ह्याचे विशेष सहकार्य लाभले. असा नाविण्य पूर्ण ब्युटी पेजन्ट कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल अध्यक्ष रेश्मा कुरूप व ऍडव्होकेट मनोहर सचदेव ह्यांचे विशेष कौतुक.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133