पनवेल दि.२७: राष्ट्रीय छात्र सेनेच्या वायुसेना विभागातील 1 MAHARASHTRA AIR SQN NCC युनिट तर्फे बी.के. बिर्ला महाविद्यालय कल्याण येथे नुकतेच दिनांक 15 मे ते 24 मे 2025 या कालावधीत 10 दिवसांचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील एकूण 362 कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. सदर शिबिरात कॅरेट्सना व्यक्तिमत्व विकास, रायफल नेमबाजी, परेड संचलन, आपदा व्यवस्थापन, अग्निशामक यंत्र हाताळणे, स्वसंरक्षण आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. या व्यतिरिक्त शिबिरात चित्रकला, निबंध लेखन, वैयक्तिक नृत्य स्पर्धा व 100 मीटर धावणे या वैयक्तिक तर डॉजबॉल, रस्सीखेच, परेड संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम अशा सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या सोहम सासवडे याने चित्रकला स्पर्धेत, नेहल येलावे हिने निबंध लेखनात, स्वप्रीत शिंदे हिने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला, शंभर मीटर धावणे मध्ये मुलींच्या गटात श्रावणी उबाळे हिने प्रथम तर मुलांच्या गटात वैभव गुप्ता याने द्वितीय क्रमांक मिळविला. सांघिक स्पर्धेत डॉजबॉल, ग्रुप डान्स, परेड संचलन या तीन बाबींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. वैयक्तिक व सांघिक मिळून 8 पैकी 7 प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. यातच दुग्ध शर्करा योग म्हणूनच कॅडेट निमिषा खापरे व कॅडेट अनुकूल जाधव यांना शिबिरातील सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरविण्यात आले. NCC Officer संगम डंगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅडेट अनन्या राऊत व कॅडेट निमिषा खापरे यांच्या नेतृत्वाखाली न्यू होरायजन शाळेच्या कॅडेट्सनी अतुलनीय कामगिरी करत मुंबई ठाण्यातील नावाजलेल्या शाळांना धूळ चारत हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, डायरेक्टर डॉ. स्वाती शिराळकर, प्राचार्या डॉ. अमिता दत्ता, उपप्राचार्या, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. वायुदलाचे NCC चे हे एकमेव युनिट रायगड जिल्ह्यात असून (मुंबई , ठाणे वगळता) या कामगिरीबद्दल रायगड सह पनवेलकरांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🔸उरणमधील नुकसानग्रस्त भागाची महेंद्रशेठ घरत यांनी केली पाहणी

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!