पनवेल दि.२७ (कृष्णा पाटील) : 26 मे 2025 रोजी सकाळी अचानक झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळाने संपूर्ण उरण तालुक्यामध्ये हाहाकार माजवला उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाली, पत्रे उडून घरामधील अनेक साहित्याची तोडफोड झाली आहे, अनेक विद्युत उपकरणे फुकट गेले आहेत, अनेक कडधान्य वाया गेले आहेत तसेच काही नागरिक सुद्धा यामध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत : त्यामध्ये कलंबुसरे आणि सारडे या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे: म्हणूनच जिथे विषय गंभीर तिथे महेंद्रशेठ खंबीर या उक्तीप्रमाणे सतत गोरगरिबांना, संकटामध्ये असणाऱ्या नागरिकांना मदत करणारे नेते जे नाही आमदार नाही खासदार पण समाजाची असणारी बांधिलकी जोपासून प्रत्येक संकटाच्या वेळी धावून जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत साहेब यांनी कलंबुसरे आणि सारडे या दोन्ही गावांमध्ये जाऊन ज्या ज्या घरी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे त्याची पाहणी केली आणि त्वरित त्यांच्याकडून मदतीचा आश्वासन दिल आहे तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत जागेवरून चर्चा करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मदत देऊन आणि ती मदत लवकर लवकर द्यावी यासाठी कलेक्टर, प्रांत, उरणचे तहसीलदार यांना फोन करून तसेच जागेवर असणारे शासकीय अधिकारी यांना विनंती केली: यावेळी त्यांच्या समवेत उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद भाई म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष उमेश भोईर, कलंबुसरे सरपंच उर्मिला नाईक, उरण तालुका युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी उपसरपंच सारिका पाटील, काँग्रेस नेते भालचंद्र पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, शिवसेना नेते निनाद नाईक, काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, ग्रामपंचायतिचे सदस्य, पत्रकार महेश भोईर, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते डी:बी. भोईर, संकेत पाटील तसेच मोठ्या प्रमाणे नुकसानग्रस्त नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

🛑NCC’s annual training camp: 🔸न्यू होरायझन शाळेने पटकावले विजेतेपद

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!