रत्नागिरी दि.२६ (सुनील नलावडे) : रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पेरणी पूर्व पावसामुळे तळ कोकणातील शेतकरी अचंबित झाला असून यावेळी मृग नक्षत्र सुरु होण्या पूर्वीच शेतकरी भात पेरणीच्या कामाला लागला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीचा हंगाम सुरु झाला असून आता तरी शेतकरी खुश आहे, मात्र हवामान खात्याच्या जून मधील पाऊस पडणार नसल्याच्या अंदाजाने त्यांच्यामध्ये चल बिचल सुरु झाली आहे.
तळ कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर हा चौथ्या दिवशी सुध्दा कायम असून धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे जन जीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी गावाला जोडणारे रस्ते व तालुक्याला जोडणारे रस्ते वाहतूक खंडित झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर पर्यंत प्रचंड खड्डे पडले असून काँक्रीट रस्त्यावर वाहने चालवणे अति धोकादायक बनले आहे. रस्त्यावर येणारी दगड माती त्यामुळे काँक्रीट रस्त्यावरून जाताना वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील चौपदरीकरण चालू असताना बांधण्यात येणारे उड्डाण पूल, दुतर्फा गटारे यांची चालू असणारी कामे व रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी कोकणवासीयांना चिखलातून वाट काढत, जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पादचाऱ्यांना जाणेसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली चौदा वर्षे सुरु असून संपता संपत नसल्याने दर पावसाळ्यात चाकरमान्यांचे हाल होत आहेत. मिऱ्या नागपूर महामार्गामुळे आंबा घाट हा वाहतुकीस यावेळी सुध्दा धोकादायक ठरत आहे. साखरपा पासून आंबा घाट संपे पर्यंत तर रत्नागिरी पाली पासून पुढे साखरपा पर्यंत हा महामार्ग खोद कामामुळे चिखलमय झाला असून दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली असल्यामुळे या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. आंबा घाटाचे रुंदी करनाचे काम जोरात असून गाय मुखा पर्यंत हे काम पूर्ण होतेय असे असले तरी उंच डोंगर कडे फोडून हे रुंदीकरण झाल्याने आता जोराच्या पावसाने सैल झालेले मोठ मोठे दगड सुटून खाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याचे अद्याप रुंदीकरण होत असले तरी काँक्रीटीकरण तितकेसे झालेले नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर, पूल, रस्ते यांची एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी पाहणी करून संबंधित विभागांना सुरक्षिततेच्या दृष्टीने व धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करणे बाबत योग्य त्या सूचना दिल्या. तसेच तहसील कार्यालय लांजा येथील नियंत्रण कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. लांजा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सून काळात घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करुन योग्य त्या सूचना दिल्या.
तसेच एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आज तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेऊन राजापूर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तसेच धोकादायक, दरड प्रवण क्षेत्रात, व पूर परिस्थितीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या, त्याचप्रमाणे राजापूर शहरातील पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली .

🛑कोपर स्मशानभूमी तोडक कारवाईला जनआंदोलनातून प्रखर विरोध

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!