पनवेल दि.९: पनवेलच्या विकासाचा सतत आलेख उंचावणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिका हद्दीतील शहर व गावांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून गावांच्या विकासासाठी जवळपास ३० कोटी रुपयांच्या विकासकामांना महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.
शहरांप्रमाणेच गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहेत. गावे विकासाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट झाली पाहिजेत या अनुषंगाने परेश ठाकूर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. आज पनवेल महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील गावातील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त सांडभोर मॅडम, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, हरेश केणी, बबन मुकादम, रामजी बेरा, माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते. तसेच इतर नगरसेवकांनी ऑनलाईन पद्धतीने या सभेत सहभाग घेतला. या सभेनंतर सभागृहनेते परेश ठाकूर व इतर मान्यवरांनी पत्रकारांशी संवाद साधून पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी यापुढेही जास्तीत जास्त काम करण्याचे नमूद केले.
पनवेल महानगरपालिकेत २३ ग्रामपंचातीमधील गावांचा समावेश झाल्यानंतर या गावांचा शहराच्या धर्तीवर विकास करण्याच्या उद्दिष्टाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना न्याय देण्याच्या संकल्प केला. त्यानुसार त्यांनी गावोगावी जाऊन ग्रामस्थांशी बैठका, भेटीगाठी घेऊन चर्चा केली. गावांना अपेक्षित काय आहे याची चाचपणी केली, त्यानुसार या गावांना विकासकामांची भेट त्यांनी आता प्रत्यक्षात दिली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!