पनवेल दि.10: अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी प्रत्येक भारतीयांचे योगदान असावे म्हणून निधी समर्पण अभियान 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. या अभियानात देशभरातील सर्व गावातील सर्व घरांमध्ये यासाठी आवाहन करण्यासाठी रामभक्त नियोजन करीत आहेत. याच उद्दिष्टाने खारघर सेक्टर 12 मध्ये आज रामभक्तांनी रामनामाच्या जयघोषात प्रभातफेरीत सहभाग घेतला. या वेळी मुलांनी भगवान राम, सितामय्या व हनुमानजी यांची वेशभूषा परिधान करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रभात फेरीत संघाचे अक्षय तोरसकर, शशीभूषण पुरंदरे, दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय जाधव, विश्व हिन्दू परिषदेचे कृष्णा बांदेकर, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष रमेश खडकर, सरचिटणीस दीपक शिंदे, नगरसेवक रामजी भाई बेरा, अध्यात्मिक सेलचे संयोजक नावलकुमार मोरे, जेष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शारबीद्रे, सीमा खडकर, स्वाती राणे, सचिन केदार, कमलेश मिश्रा, शशांक विरेकर, इशिका आचरेकर, सिद्धेश खडकर व भाजप कार्यकर्ते, स्वयंसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!