अलिबाग दि.8: पोलादपूर तालुक्यातील खडपी गावातून लग्नाचे वर्हाड कुडपण येथे गेले होते. लग्न लावून परत येताना अपघात होवून सुमारे 150-200 फूट खाेल दरीत ट्रक कोसळला. कुडपण धनगरवाडी जवळ एका वळणावर हा अपघात झाला. पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता..
या घटनेनंतर स्थानिक प्रशासन यंत्रणा,आरोग्य यंत्रणा पोलीस यंत्रणा महाड, कोलाड, महाबळेश्वर रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले.
आतापर्यंत ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे 43 जखमींना दाखल केले असून तीन जणांचा मृत्यू झाला आला आहे.
सहा जखमींना एमजीएम, कळंबाेली आणि जिल्हा रुग्णालय,अलिबाग या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.