पनवेल दि.१७: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी या वर्षाचा पहिला भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देवद येथील डी. डी. विसपुते कॉलेजमध्ये होणाऱ्या या जॉब फेअरमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.विविध ४० कंपन्यांच्या माध्यमातून एक हजारहून अधिक नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध असणार असून या संदर्भात अधिक माहितीसाठी ९०२९४०४६६६ किंवा ९०२९४०४७७७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!