पनवेल दि. २१: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरानाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये खारघर नोड मध्ये कोरानाची रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरानाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.
खारघर येथील सेंट्रल पार्क हे सुमारे १००एकर परिसरात पसरलेले भव्य असे उद्यान आहे. या ठिकाणी रोज नवी मुंबई, कामोठे, कळंबोली येथील नागरिक मोठय़ा संख्येने भेट देत असतात. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असते. खारघर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.