पनवेल दि.21: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटिश कौन्सिलकडून इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड मिळाला आहे. या जागतिक बहुमानामुळे शाळेसह संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शालेय अ‍ॅक्टिव्हिटी स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्याकडील संस्कृती, पद्धती, नाच-गाणे व विज्ञान या सर्व कृतींद्वारे विदेशातील मुलांमध्ये माहितीचे आदानप्रदान केले, तसेच आपल्या मुलांनासुद्धा विदेशातील संस्कृती व कलांची माहिती मिळाली. हे सर्व मुलांनी व शिक्षकांनी कृतीद्वारे ब्रिटिश कौन्सिलकडे पाठविले. त्यांना आपल्या कलागुणांचे कौशल्य आवडले. यातून जनजागृती, जिज्ञासा होत असल्याने ब्रिटिश कौन्सिलने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड दिला आहे. ब्रिटिश कौन्सिलकडून शाळेला ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळाले आहे.
याबद्दल मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी सांगितले की, आम्ही माहितीचे आदानप्रदान अमेरिका, यूएई, इंडोनेशिया, जॉर्जिया या देशातील मुलांबरोबर केले होते. या क्रियेमुळे मुलांमध्ये ज्ञान आणि जिज्ञासा प्राप्त होते. मुलांना हे एक व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे. हे सर्व संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. या बहुमानाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेच्या मुख्याध्यपिका राज अलोनी यांच्यासह व्ही. लक्ष्मी रेखा, चसमिंदरकौर बक्षी यांचे अभिनंदन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!