ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे ‘बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’ ने सन्मानित
पनवेल दि.०३ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात येते. त्याचप्रमाणे सन २०२४ च्या पुरस्काराचे वितरण समारंभ मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ विचारवंत अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते भरत जाधव, कामगार नेते महेंद्र घरत, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, अनिल वाघमारे, शोभा जयपूरकर, विशाल परदेशी, दीपक कैतके, राजा आदाटे, संजय मिश्कीन, विनायक सानप, दीपक पवार, पांडुरंग म्हस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यात अभिनेता भरत जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याच प्रमाणे पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महेश म्हात्रे, अभिजित करांडे, अमेय शिरोडकर, पांडुरंग पाटील, सर्वोत्तम गावरस्कर, दिनेश केळुस्कर, सीमा मराठे, बाळासाहेब पाटील, शर्मिला कलगुटकर, भरत निगडे आदींना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

🛑तळोजातील गुंड नवी मुंबईतून हद्दपार🔸गुंड मन्सूर पटेलवर पोलिस उपायुक्तांची कारवाई

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!