पनवेल दि.३: तळोजा आणि खारघर परिसरात दहशत पसरवून सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माँण करणारा गुंड मन्सूर इब्राहिम पटेलला (वय ५२ ) नवी मुंबई पोलिसांनी ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. परिमंडल १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी नुकतीच ही कारवाई केली. मन्सूर पटेलवर नवी मुंबईत वेगवेगळ्या प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत.
रस्त्यात अडवून मारहाण करणे, मासळी बाजारात दहशत निर्माँण करणे, चाकूने मारहाण करून जिवितास हानी पोहचविणे आदी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तळोजा येथील रहिवाशी मन्सूर इब्राहिम पटेल (वय ५२) याच्यावर गुन्हे दाखल आहेत. किरकोळ कारणावरून तळोजा गावात वाद निर्मांण केल्यामुळे मन्सूर पटेलवर तळोजा पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. तीन गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होत नसल्यामुळे २३ ऑगस्ट २०२३ रोजी तळोजा पोलिसांनी सीआरपीसी कलम १०७ अंतर्गंत चँप्टर केसचा प्रस्ताव सादर केला होता. यात १५ हजार रूपयांच्या जामिनदारासह जात मुचलका बंधपत्र घेण्यात आले. परंतू याच कालावधीत मन्सूर शांत राहिला नाही. दरम्यान तळोजा पोलिस ठाण्यात पुन्हा दखलपात्र गुन्हा झाला. पोलिसांनी मन्सूर वास्तव्यास असलेल्या तळोजा परिसरात मन्सूरबाबत चौकशी केली असता गोपनीय साक्षीदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. संबंधीत व्यक्ती सर्वसामान्यांना नाहक त्रास देवून वारंवार वाद घालतो. ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचे सांगितले. या तक्रारींची गंभीर दखल घेवून नवी मुंबई पोलिसांनी या गुंडाची दहशत संपविण्यासाठी पुढचे पाऊल टाकले. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

🛑अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!