अलिबाग दि.१५: अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले,
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे आलेला महापूर,दरड दुर्घटना व करोना या संकटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण झाले.
या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल महापलिकेत महापौर डॉ. कविता किशोर चौतमाल हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड ,आयुक्त गणेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

पनवेल महापलिकेच्या हुतात्मा स्मारक उद्यानात स्वातंत्र्य सैनिक बबन धारणे यांच्या पत्नी ताराबाई बबन धारणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्म्यांचा त्याग कधीही विसरता येणार नाही. त्यांच्यामुळे नवे काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!