पनवेल दि.१५: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रियंका टीव्हीएस शोरूमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवून देशाचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंच्या सन्मान म्हणून आयोजित करण्यात आलेल्या एओजी मोटारसायकल रॅलीला झेंडा दाखवून रॅलीचा आरंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रियंका टीव्हीएसचे मालक फतेह लाल जैन यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत व सन्मान केला. या कार्यक्रमास पनवेल इस्टेट कॉप सोसायटी अध्यक्ष विजय लोखंडे, संचालक सुनील सुचक, टीव्हीएस कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक मुदस्सर, सीएफओ सुबोध जैन, जीएम अरुण कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
फतेह लाल जैन यांनी ११ वर्षांपूर्वी प्रियांका मोटर्सची सुरुवात केली आणि आज ही कंपनी नवी मुंबई आणि रायगडमधील आघाडीच्या दुचाकी एजन्सींपैकी एक आहे, तिचा विस्तार वाशी, पनवेल आणि खारघरमध्ये आहे.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचे कौतुकही केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!