गटई कामगार, सुवर्णकार समाजातर्फे पाठिंबा
गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपात दाखल
पनवेल दि.११: सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजातील गटई कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते व प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश ठाकूर, युवक अध्यक्ष श्री. नेरूळकर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष सुनिल मोहोड, माजी नगरसेवक सुनिल नाईक, श्री कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गटई कामगार उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांना नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे यांनी पाठिंबा पत्र दिले आहे.
नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात आलेल्या पाठिंबा पत्रात म्हंटले आहे कि, खारघर, कळंबोली, नावडे, तळोजा, खांदेश्वर, कामोठे, खांदा कॉलनी, पनवेल, नवीन पनवेल व परिसरातील सर्व सुवर्णकार समाज स्थायिक रहिवाशी सभासद बंधू भगिनींतर्फे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे सभासद व त्यांचे कुटुंबीय असे समस्त सुवर्णकार समाज बांधव मतदार आपल्या सदैव पाठीशी असल्याचे नमूद करून भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी शुभेच्छाही या पत्रातून दिल्या.
समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, गोवा राज्याचे आमदार दयानंद सोपटे, भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, तालुका उपाध्यक्ष एस. के. नाईक, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ नेते सी.सी.भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, अमरीश मोकल, युवा नेते प्रतीक सादरानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निल पुजारा यांच्याकडे युवकांची फळी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे.