पनवेल दि.10: सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांनी शेकापक्षातून स्वगृही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे.
महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. चंद्रकांत पोपेटा यांच्यासह गुरुनाथ पाटील, सुरेश गुप्ता, दीपक गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश पनवेलमध्ये झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे भाजपा आमदार महेश बालदी, संघटन मंत्री सतीश धोंड, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, किशोर सुरते, राजेश पाटील, महेश पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील तसेच अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.