पनवेल दि.11: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ‘गणेशोत्सव २०२२’ करीता गणेश मंडळांकडुन मंडप परवानगी शुल्क – नोंदणी शुल्क व अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला आहे.
   सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त नियोजन हेतू आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात 8 ऑगस्टला बैठक घेण्यात आली होती. या बैठकित गणोशोत्स्व शुल्क माफ करावा अशी मागणी गणेश मंडळांनी केली होती.
     महराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून नुकत्याच आलेल्या पत्रानुसार मोहरम, दहिहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा, सुव्यवस्था आणि इतर समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली होती. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. २१ जुलै २०२२ रोजी झालेल्या या बैठकीच्या इतिवृत्तानुसार मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार गणेशोत्सव मंडळांकडुन महानगरपालिका आकारत असलेले नोंदणी शुल्क माफ करण्याचे कळविण्यात आलेले आहे. त्यानूसार आज प्रशासक तथा पालिका आयुक्त यांनी गणेशोत्सव साजरा करणेकामी मंडप परवानगी शुल्क – नोंदणी शुल्क व अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
       पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवानगी  देणार आहे. यासाठी http://smartpmc.in/Login ही वेबसाईट तयार केली असुन, गणेश मंडळांनी या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच  महापालिकेच्यावतीने हा परवाना मिळण्यासाठी एक खिडकी योजनेअतंर्गत अग्निशमन ना हरकत दाखला, वाहतुक ना हरकत दाखला व महानगरपालिकेची मंडप उभारणेबाबतची परवानगी मिळणार आहे. गणेश मंडळांनी अधिक माहितीसाठी महापालिकेच्या १८००-२२७-७०१ या टोल फ्री क्रमांक संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी panvelcorporation@gmail.com ई-मेल, दुरध्वनी क्रमांक : ०२२-२७४५८०४०/४१/४२ , व्हॉट्सअॅप क्रमांक व एस. एम. एस. सुविधेसाठी  ९७६९०१२०१२ हे क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!