कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलाच्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांची भव्य दिव्य प्रभात फेरी
पनवेल,दि.10 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ फडकविण्याच्या आवाहनाला पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील विविध शाळांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. या अभियानांतर्गत आज पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांनी प्रभात फेरी काढून ,विविध स्पर्धा करून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची प्रचार व प्रसिध्दी केली.
यामध्ये सुधागड विद्या संकुल कळंबोली कॉलनी सेक्टर 3ई ची जुनी इमारत तसेच सेक्टर १ ई ची नवी इमारत या दोन्ही इमारती मधुन मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, अशी सर्व माध्यमे मिळून भव्य दिव्य अशा ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे पाऊस असूनही विद्यार्थ्यांचा उत्साह पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ओसंडून वाहत होता. रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या विविध सोसायटींतील नागरिकांनी या प्रभात फेरीचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.
या रॅलीमध्ये विविध विद्यार्थी पथके सहभागी झाली होती. सदर पथकांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ वर्षे म्हणून ७५ विविध थोर महापुरुषांच्या वेषभुषा, विविध राज्यांची संस्कृती प्रकट करणारे चित्ररथ, महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारी अशी एकूण ४५पथके , ढोल पथकासह लेझीम व झांज अशी विविध पथके मिळून सुमारे साडे पाच हजार विद्यार्थी, ४००शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅलीस उपायुक्त विठ्ठल डाके, प्रभा्ग अधिकारी सदाशिव कवठे, वाहतुक निरीक्षक संजय नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रॅलीत रुग्णवाहिका पथक व माजी नगरसेवक व समाज सेवक, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस, पनवेल महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी ,अग्निशमन दलाचे कर्मचारी ,सी आर पी एफ चे वाहन व जवान , मेडिकल ऍम्ब्युलन्स, अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घेतला. या रॅलीचे नियोजन करण्यामध्ये सुधागड शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे, शिक्षक विलास पाटील सर व संगीता वाशिकर, स्त्री शक्ती फौंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.
याचबरोबर पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील रोडपाली गावातील जिल्हा परिषदेची शाळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर जिल्हा परिषेदेची शाळा या दोन्ही शाळांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022,‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत राष्ट्रध्वजाचे शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. तसेच खिडुकपाडा गावातिल जिल्हा परिषद शाळांना स्वांतत्रयाचा अमत महोत्सव अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापक,शिक्षिका व विद्यार्थ्यांना झेंडयाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी कमॊठे येथे शाळेच्यावतीने प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीला उपायुक्त विठ्ठल डाके यांनी मार्गदर्शन केले. एसजीटी शाळेच्या मुख्याध्यापिका शोयाबा सय्यद तसेच शिक्षकवृंद यांचे आयोजन करण्यात मोलाचा सहकार्य मिळाले.
नवीन पनवेल पनवेल महानगरपालिका स्वातंत्राच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानाची वासुदेव बळवंत फडके शाळेमध्ये माहिती देण्यात आली. यावेळी शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना झेंडे वाटप करण्यात आले. यावेळी फडके शाळेचे, प्राचार्य, शिक्षक वर्ग, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक अजिंक्य हळदे. पर्यवेक्षक संदीप कांबळे आणि कर्मचारी उपस्थित होते.
जनजागृती रॅलीत नावडे हायस्कूल सुमारे १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी पालिका अधिकारी विश्राम म्हात्रे आणि कर्मचारी उपस्थित होते.
नवीन पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयातील 4500 विद्यार्थ्यांसोबत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या ठिकाणी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी विद्यार्थ्यांना अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच पालिकेच्यावतीने झेंड्याचे वाटप करण्यात आले.
पालिकेच्या उर्दू शाळेच्यावतीने रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे 60 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
तसेच सरस्वती इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांबरोबर जी.डी पोळ मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीस उपायुक्त डाके यांनी मार्गदर्शन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!