मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवशी आदिवासी पाड्यावर अन्नदान. राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे गोर गरीब मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा.
पनवेल दि.२५: श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकाद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा करू नका असे समर्थकांना सांगितले तर गरिबांना व गरजूंना शक्य तेव्हडी मदत करा असे आदेश दिले होते. आजच्या काळात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा आत्महत्या थांबत नसून हा चिंतेचा विषय आहे याची खंत उदयनराजे भोसले यांनी लिहून दाखवली आहे. महाराजांच्या आदेशाचा मान राखून मा. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान या संस्थेतर्फे जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, मुंबई संघटक चंद्रकांत धडके मामा व मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार मा. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त एक घास घरिबांसाठी या उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील टावरवाडी या आदिवासी पाड्यावर आज आदिवासी बांधव व लहान मुले यांच्यासोबत भोजन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून याठिकाणी अन्नदान करण्यात आले.या कार्यक्रमास मुंबई संघटक चंद्रकांत धडके, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, धारावी विधानसभा अध्यक्ष सचिन लोखंडे, विशाल कटके, खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, विजय पाबळे, राजू मोरे, अनिकेत घाडगे, अक्षय पवार, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, अनिकेत मोरे, वैभव पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, टावरवाडीचे सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.