पनवेल,दि.14: कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुलामुलींना अर्थसहाय्य मिळण्याचा विषय आज झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकित मंजूर करण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची बैठक आज सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील सभागृहात आज ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सचिव तिलकराज खापर्डे व इतर सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.
बदलत्या जीवनशैली व प्रदुषणामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सर आजाराच्या उपचाराकरिता होणारा खर्चही मोठा असतो. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अशा गरजू लोकांना रूग्णाच्या औषधोपचाराकरिता मदत म्हणून अर्थसहाय्य दिल्यास त्यांना आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत होईल. या हेतूने हा विषय बैठकित मांडण्यात आला. या विषयास सर्व सदस्यांनी मंजूरी दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133