पनवेल दि.१२: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने “चेस फोर एव्हरीवन” या उपक्रमाअंतर्गत पाच दिवसीय राष्ट्रीय पंच प्रशिक्षण शिबीर ऑनलाइन घेतले. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे या राष्ट्रीय पंच प्रशिक्षण शिबीरासाठी राज्यस्तरीय पंच परीक्षेत ए ग्रेड मिळविलेले अमित कदम आणि श्रेयस पाटील यांची निवड करण्यात आली होती. शिबिर पूर्ण करून घेतलेल्या सहभागी सर्वांची लेखी/ प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. 30 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत रायगड मधील आपले राज्यस्तरीय पंच अमित कदम आणि श्रेयस चंद्रशेखर पाटील हे यशस्वी पणे सिनीअर नॅशनल राष्ट्रीय पंच म्हणून बहुमान संपादिला जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे त्त्यांना नॅशनल आर्बिटर असे लायसन्स देण्यात येणार आहे श्रेयस पाटील हा सीकेटी कॉलेज पनवेल येथे एम. एस .सी. (कम्प्युटर सायन्स) करत आहे. संपूर्ण भारतातून या शिबिरातून राष्ट्रीय पंच म्हणुन 481 जण उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत ए व बी ग्रेड मिळालेल्या सर्वांना जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) यांच्याकडून नॅशनल आर्बिटर (राष्ट्रीय पंच)असे लायसन्स तर सीनियर नॅशनल आर्बिटर टायटल अशा पदवीचे प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्रा मधून 29 जण पास झाले आहेत. 24 जण “B” ग्रेड मध्ये तर 5 जण “C” ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या दोघांना रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे तसेच पनवेल चेस असोसिएशनचे सचिव सी. एन.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व रायगड बुद्धिबळ स्पर्धक आणि रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटने कडून सीनियर नॅशनल आर्बिटर झाल्याबद्दल त्या दोघांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!