उरण दि.१५ (विठ्ठल ममताबादे) दुर्ग मावळा प्रतिष्ठान या गड किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या संस्थेतर्फे उरण तालुक्यातील एतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.18, 19 फेब्रुवारी 2022 रोजी असे दोन दिवस शिवजन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान उरण विभाग, शिवभक्त प्रतिष्ठान उरण विभाग, शिवशक्ती मित्र मंडळ उरण चारफाटा, योगा विथ पूनम ग्रुप, यान्सी ग्रुप ऑफ लिव्हीस टीम, युवा शिवशक्ती मित्र मंडळ डाऊरनगर, शिवछत्रपती मित्र मंडळ करंजा, अवनी सामाजिक संस्था उरण, डाऊर नगर ग्रामस्थ आणि मित्र परिवार आदी संस्था या शिवजनमोत्सवात सहभागी होणार आहेत.
शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता द्रोणागिरी गडाची साफसफाई, सायंकाळी 5 वा. गडावरील कुंडातील पाणी घेऊन खाली उतरणे, सायंकाळी 7 वा. विमला तलाव उरण शहर यथे महाराजांच्या मूर्तीचे अभ्यंग स्नान, सायंकाळी 8 ते 9:30 दरम्यान द्रोणागिरी गडाबद्दल माहिती आणि इतिहास वर्णन, सायंकाळी 10 वा. मशाल फेरी आणि विमला तलाव येथे दीपोत्सव तसेच 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7 वा. बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलविणे, सकाळी 8 वा. शिवप्रतिमा पूजन, 9 वा. प्रतिमा मिरवणूक, शिव राज्याभिषेक, दुर्ग पूजन, पोवाडा, व्याख्यान, मान्यवरांचे स्वागत व शिवभोजन, सायंकाळी 5 वा. गडावरून खाली उतरणे,6 वा. निरोप समारंभ असे दोन दिवस विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिवजमोत्सवात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी प्रकाश कवले -9930470955,
सतीश जुनघरे -9664730546,
प्रांजल पाटील -9619500228,
रविंद्र भोईर -9969314399,
चेतन गावंड -9819759105
यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!