रत्नागिरी दि.१४(सुनिल नलावडे) गौरीसोबत पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन चाकरमान्यांच्या उपस्थीतीत व सहभागाने पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये जल्लोशात पार पडले. कोरोनाचे नियम पाळून अत्यंत शिस्तबध्द पणे विर्सजन सोहळा गावा गावामध्ये पार पडला.
संगमेश्वर तालुक्यात खाडीपट्यातील गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तसेच होडीमधुन गणेश मुर्तींचे विर्सजन पार पडले. संगमेश्वर मधील करजुवे गावात पारंपारीक पद्धतीने होडीतुन विसर्जन करण्यात आले.
देवरुख मध्ये होड्यांवरती वाहत्या पाण्याच्या नाला व पऱ्यांवर तर काही ठिकाणी मोठ्या चिरेखाणींमध्ये तसेच तलावांमध्ये ग्रामस्थ व चाकरमान्यांच्या उपस्थीतीत व पोलीसांच्या निगराणी खाली गणेश विसर्जन संपन्न करण्यात आले. देवरूख ताल्युक्यातील निवदे गावच्या कदम वाडी व चव्हाण वाडी मधील गौरी गणपतीचे विसर्जन निवदे गावच्या ओढ्यावर पार पडले.