मुंबई, दि.10 : पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज विधानमंडळाच्या प्रांगणात महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ डायजेस्टीव्ह सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पद्मश्री डॉ.अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ केंद्र हे भारतातील पहिले केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बीआयडीएस केंद्राचे संचालक पद्मश्री डॉ.अमित मायदेव आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!