पनवेल दि.१०: रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कामोठे येथे प्रोफेशनल कॉलेज अर्थात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कामोठे सेक्टर 11 येथे झालेल्या या सोहळ्यास ‘रयत’च्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, ‘रयत’चे सचिव भाऊसाहेब कराळे, निरीक्षक संजय मोहिते, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, आदी उपस्थित होते. या वेळी विचार मांडताना डॉ. अनिल पाटील म्हणाले की, कामोठ्यात उभारण्यात येणार्‍या या कॉलेजसाठी 1912 साली प्लॉट घेण्याचे ठरविले होते. संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली असताना शिक्षणासंदर्भात पुढील काळातील होणार्‍या बदलांचे विचार येतात. काळाप्रमाणे तंत्रज्ञान बदलत असते. ते लक्षात घेऊन पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज आहे. येथील प्रकल्पासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जबाबदारी घेतल्याने डॉ. पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!