पनवेल दि.२६:पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि विविध प्रभाग समिती सभापतींच्या रिक्त होणार्‍या जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन निवडणूक होणार आहे. यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सत्ताधारी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपिळे यांचा यशस्वी कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या रिक्त होणार्‍या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत स्थायी समिती सभापतिपदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी नगरसेविका मोनिका महानवर तसेच प्रभाग समिती ‘अ’साठी नगरसेविका अनिता पाटील, प्रभाग समिती ‘ब’साठी नगरसेवक समीर ठाकूर, प्रभाग समिती ‘क’साठी नगरसेविका हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ‘ड’साठी नगरसेविका सुशीला घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे सादर केला. उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व नगरसेवक विक्रांत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, अभिमन्यू पाटील, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, विकास घरत, अजय बहिरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका चारुशीला घरत, सीता पाटील, वृषाली वाघमारे, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, विद्या गायकवाड, रुचिता लोंढे, आरती नवघरे आदी उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत भाजप-रिपाइंचे एकहाती बहुमत असल्याने या निवडणुकीत सत्ताधार्‍यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!