अलिबाग,दि.22 : म्हाप्रळ-आंबेत पूल रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चार चाकी कार, जीप व्यतिरिक्त बस, ट्रक, टेम्पो यासारख्या सर्व अवजड वाहनांची वाहतूक दिनांक 31 जानेवारी, 2021 पर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
सद्य:स्थितीत पुलाच्या Pier Cap Bracket च्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. पुलाच्या बेअरिंग बदलणे व पेडस्टलची दुरुस्ती करण्यासाठी पुलाच्या गर्डर सहित स्लॅब उचलणे आवश्यक आहे. या बेअरिंग बदलणे, पेडस्टलची दुरुस्ती करणे, एक्स्पान्शन जॉईंट बदलणे, या कामासाठी सुमारे चार महिने इतका कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे या कालावधीत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केल्यानंतर प्रवाशी व विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, म्हणून आंबेत पुलाजवळ सावित्री खाडीमध्ये पर्यायी जलवाहतूक सेवा सुरु करण्यासाठी, पर्यायी प्रवासी/ रो- रो जल वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी सावित्री खाडीच्या दोन्ही बाजूस उतरत्या धक्क्याचे बांधकाम करणे आवश्यक असून, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून उतरत्या धक्क्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व सावित्री खाडीतून पर्यायी रो-रो जलवाहतूक सेवा सुरु झाल्यानंतरच पुलावरची सर्व प्रकारची वाहतूक बंद करुन पुलाचे गर्डर स्लॅबसह उचलून बेअरींग बदलणे व पेडस्टल दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे उतरत्या धक्क्याचे बांधकाम पूर्ण होऊन रो रो सेवा सुरु होणे, कोविड-19 परिस्थितीमुळे निर्माण झालेली परिस्थिती व शासनाकडून या कामासाठी निधीची अनुपलब्धता या बाबींमुळे पुलाचे स्लॅबसहीत गर्डर उचलून बेअरींग बदलणे व पेडस्टल दुरुस्ती करणे, या कामांसाठी सुमारे दि.31 एप्रिल 2021 पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!