माथेरान दि.६ (मुकुंद रांजणे) एकाच दिवसांवर गणेशोत्सव आल्याने माथेरान मध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आपल्या लाडक्या बाप्पाला दस्तुरी टॅक्सी स्टँड पासून गावात आणण्यासाठी गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार मिळाल्यामुळे आनंदाचे वातावरण दिसत आहे. यापूर्वी दस्तुरी पासून लाडक्या बाप्पाला डोक्यावर आणताना मोठी कसरत करावी लागत होती. परंतु गेल्यावर्षा पासून शेवटी याठिकाणी वाहतुकीचा अन्य सुखकर, स्वस्त आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध नसल्याने आता ई रिक्षाचा वापर सर्वच ग्रामस्थ करताना दिसत आहेत यामध्ये ई रिक्षाचे समर्थक असोत किंवा विरोधक असोत सर्वांनी या महत्वपूर्ण सेवेला मुकसंमती देऊन स्वीकारच केलेला दिसत आहे. फक्त आपले राजकीय क्षेत्रातील अथवा एखाद्या संस्थेतील स्थान अबाधित राहावे यासाठी ई रिक्षाला विरोध दर्शविला जात आहे त्याशिवाय विरोध करणाऱ्या मंडळींची अर्थकारणाची दुकाने चालणार नाहीत असेही बोलले जात आहे.
सद्यस्थितीत गावातील सर्वच गणेशभक्त आपल्या घरापर्यंत बाप्पाला नेण्यासाठी ई रिक्षाचा वापर करीत असून ई रिक्षा संघटनेचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत.