मुंबई दि.8: मुंबई शहरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्याने. मुसळधार पावसाने मुंबईत काही ठिकाणी तुंबली असून गुडघ्यापर्यत पाणी साचले आहे. मुंबईतील रेल्वे परिसरात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरी आणि हार्बर लाईनवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, विक्रोळी आणि भांडूप रेल्वे रुळावर पाणी साचले असून. रात्री मुसळधार पाऊस झाल्याने दादर परिसरात पाणी साचले होते. या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाली आहे.