यमुना सामजिक संस्थेतर्फे दिघोडे गावाला रुग्णवाहिका
पनवेल दि.८: यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देवून नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. रविवारी हा दिमाखदार सोहळा दिघोडे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते.
गावातील ग्रामस्थांच्या अडचणी म्हणजे आयत्या वेळी अचानक मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते. दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी महेंद्र घरत यांच्या कानावर सदर बाब घातली असता महेन्द्र घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले. नुसते आश्वासन नाही तर रविवारी हे आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात उतरविले.
सदर रुगणवाहिकेचे लोकार्पण महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिलिंद पारगावकर, अखलाख शिलोत्री, डॉ.मनीष पाटील, महेंद्र ठाकूर, विनोद म्हात्रे, १८ गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, न्यू मेरिटाईम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष वैभव पाटील, सचिन घरत, माजी सरपंच अविनाश पाटील, विद्यमान सरपंच किर्तिनिधी ठाकूर, उपसरपंच अभिजित पाटील, कृष्णा पारिंगे, रेखा घरत आदी प्रामुख्याने उपस्थित होेते. सामाजिक चळवळीची बांधीलकी जपण्याची शिकवण मला आई यमुना हिने दिली आहे. पक्षीय राजकारण न बघता रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात जे समाधान आहे ते कशातच नाही, असेची महेंद्र घरत यांनी सांगताना आपले काम सेवेचे, कष्टकर्‍यांसाठीचे आहे हे कायम लक्षात ठेवा. लोकांचे काम होणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!