पनवेल,दि.13 : पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय पोषण कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ खारघर यांच्याकडून नुकतेच महापालिकेच्या माध्यमातून क्षय रूग्णांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी , रोटरी क्लब ऑफ खारघरचे अध्यक्ष बाळशेखर छिलाना,नमिता छलिना, डॉ प्रकाश मानाजी , डॉ.छाया तारळेकर, राजेश राठोड, रूबीना नायक महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल पाटील आदि उपस्थित होते.
क्षय रूग्णांचे आजारादरम्यान वजन कमी होत असते. त्यांना सकस आहारची गरज असते. यासाठी पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय पोषण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ खारघर यांनी खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुमारे 75 क्षय रूग्णांना दोन महिने पुरेल एवढ्या प्रोटीन पावडरचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या प्रोटीन पावडरमुळे क्षय रूग्णांची रोग प्रतिकारक शक्ती वाढणार आहे.