अलिबाग, दि.23: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 736 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 84 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-53, पनवेल (ग्रा)-9, उरण-1, खालापूर-2, कर्जत-2, पेण-1, अलिबाग-3, रोहा-13 अशा प्रकारे एकूण 84 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 9 व्यक्तींची (पनवेल मनपा-5, पनवेल ग्रामीण-1, खालापूर-1, पेण-1, महाड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.


सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-393, पनवेल ग्रामीण-141, उरण-34, खालापूर-7 कर्जत-40, पेण-36, अलिबाग-43, मुरुड-1, माणगाव-12, रोहा-23, महाड-20, पोलादपूर-8 अशी एकूण 758 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-979, पनवेल ग्रामीण-279, उरण-177, खालापूर-13, कर्जत-34, पेण-28, अलिबाग-40, मुरुड-17, माणगाव-55, तळा-12, रोहा-25, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-29, महाड-17 पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 736 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-56, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, पेण-4, माणगाव-1, रोहा-1,महाड-2 असे एकूण 75 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-63, पनवेल ग्रामीण-13, उरण-2, खालापूर-2 कर्जत-6, पेण-1, अलिबाग-6, मुरुड-2, माणगाव-1, तळा-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-6 पोलादपूर-1 असे एकूण 110 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 7 हजार 014 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 4 हजार 342 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 68 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 2 हजार 604 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!