अलिबाग, दि.24 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जिल्हयांतर्गत प्रवासासाठी सोशल डिस्टंन्सिंग व काही अटी शर्तींच्या अधीन राहून बसेस सुरु केल्या आहेत.
राज्य परिवहन रायगड विभागातील महाड, पनवेल, अलिबाग, पेण, नागोठणे, खोपोली, पाली, श्रीवर्धन, बोर्ली, माणगाव, कर्जत या आगारांमधून जिल्हयांतर्गत प्रवास करावयाचा असल्यास नजिकच्या आगारामार्फत बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी गरजूंनी राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेचा लाभ घ्यावा. प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे जिल्हयांतर्गत प्रवासाचा पास व आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. महाड ते पनवेल सकाळी 6.30, 9.00, 13.00, पनवेल ते महाड सकाळी 10.00, 13.00, 17.00, अलिबाग ते पनवेल सकाळी 6.15, 7.45, 8.15, 9.15, 10.45, 13.30, 14.30, 15.30, 18.00, 19.15, पनवेल ते अलिबाग सकाळी 6.00, 7.00, 8.30, 10.00, 10.30, 11.30, 13.15, 15.45, 17.00, 18.00, पेण ते पनवेल सकाळी 6.00, 7.00, 8.30, 9.30, 11.15, 12.15, 13.45, 15.15, 16.15, 18.00,18.45, पनवेल ते पेण सकाळी 7.15, 8.15, 9.45, 10.45, 12.30, 13.30, 15.00, 16.00, 17.30, 19.00, 20.00, पेण ते नागोठणे सकाळी 6.30, 8.15, 14.30, 17.45, नागोठणे ते पेण सकाळी 7.30, 9.15, 15.30, 18.45, पेण ते खोपोली सकाळी 5.30, 7.45, 10.30, 11.00, 12.00, 13.00, 14.30, 15.30, 17.00, 18.15, खोपोली ते पेण सकाळी 7.00, 9.15, 12.00, 12.30, 13.30, 14.30, 16.00, 17.00, 18.30, 19.45, पेण ते पाली सकाळी 9.00, 15.45 पाली ते पेण सकाळी 11.00, 18.00, श्रीवर्धन ते पनवेल सकाळी 7.15, पनवेल ते श्रीवर्धन दुपारी 14.00, बोर्ली ते पनवेल सकाळी 7.00, पनवेल ते बोर्ली दुपारी 13.00, माणगाव ते पनवेल सकाळी 8.00, पनवेल ते माणगाव सकाळी 11.00, माणगाव ते महाड सकाळी 8.30, 17.30 महाड ते माणगाव सकाळी 9.30, 18.30, कर्जत ते पनवेल सकाळी 7.00, 7.45, 9.30, 10.00, 12.00, 12.30, 14.30, 15.00, 17.00, 17.30, 19.30, 21.45, पनवेल ते कर्जत सकाळी 8.15, 9.00, 10.45, 11.15, 13.15, 13.45, 15.45, 16.15, 18.15, 18.45, 20.45, 21.15, खोपोली ते पनवेल सकाळी 7.30, 8.30, 10.00, 11.00, 12.30, 13.30, 15.00, 16.00, 17.20, 18.30, पनवेल ते खोपोली सकाळी 8.45, 9.45, 11.15, 12.15, 13.45, 14.45, 16.15, 17.15, 18.30, 20.00,
अधिक माहितीसाठी प्रवाशांनी नजिकच्या आगारातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन रायगड राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्याकडून करण्यात आले आहे.