अलिबाग,दि.1 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 448 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 266 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-136, पनवेल (ग्रा)-31, उरण-15, खालापूर-15, कर्जत-9, पेण-20, माणगाव-15, तळा-1, रोहा-19, सुधागड-2, श्रीवर्धन-3 अशा प्रकारे एकूण 266 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही.


सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-808, पनवेल ग्रामीण-351, उरण-64, खालापूर-72, कर्जत-64, पेण-66, अलिबाग-53, मुरुड-9, माणगाव-40, तळा-3, रोहा-71,सुधागड-3, श्रीवर्धन-14, महाड-9, पोलादपूर-3 अशी एकूण 1 हजार 630 झाली आहे.

कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 392 , पनवेल ग्रामीण-356, उरण-219, खालापूर-19, कर्जत-75, पेण-63, अलिबाग-83, मुरुड-17, माणगाव-67, तळा-12, रोहा-40, सुधागड-2, श्रीवर्धन-10, म्हसळा-29, महाड-36, पोलादपूर-28 अशी एकूण 2 हजार 448 आहे.

आज दिवसभरातही पनवेल मनपा-60, पनवेल ग्रामीण-18, उरण-10, खालापूर-6, कर्जत-3, पेण-2, अलिबाग-3, माणगाव-3, रोहा-1, महाड-5 असे एकूण 111 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

आतापर्यंत पनवेल मनपा-77, पनवेल ग्रामीण-16, उरण-4, खालापूर-4, कर्जत-6, पेण-1, अलिबाग-6, मुरुड-2, माणगाव-2, तळा-2, श्रीवर्धन-3, म्हसळा-3, महाड-7 पोलादपूर-1 असे एकूण 134 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

आतापर्यंत जिल्ह्यातून 9 हजार 607 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 5 हजार 230 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 165 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 4 हजार 212 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!